बीड- जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी अचानक काढलेल्या एका आदेशामुळे पालक वर्ग संभ्रमात पडला आहे.शनिवारी शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश शिंदे यांनी काढल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.
दोन्ही विभागाचा पदभार सांभाळणारे शिक्षणाधिकारी शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की,23/12/2023 रोजी बीड शहरातील सर्व शाळा बंद ठेवण्यात याव्यात,तरी याबाबत दक्षता घेण्यात यावी.
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
शिंदे यांनी अचानक काढलेल्या या आदेशामुळे शाळा प्रशासन आणि पालक वर्ग संभ्रमित झाला आहे.कुठलेही कारण न देता शिक्षणाधिकारी मनमानी पध्दतीने शाळा कसकाय बंद ठेवू शकतात असा सवाल पालक उपस्थित करत आहेत.
Leave a Reply