बीड- शहरातील अंजुमन ए इशात तालीम या संस्थेच्या शाळेत आमेर काझी नावाच्या शिक्षकाने महिला शिक्षिकांसोबत अश्लील चाळे करून त्याची चित्रफीत पॉर्न साईट ला विकली.या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही अद्याप त्याला अटक झालेली नाही,त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.या सर्व प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलिसांकडे केली आहे.
जिल्ह्याभरात अल्पसंख्याक उर्दू शिक्षणाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या बीड शहरातील किल्ला मैदान स्थित अंजुमन इशात-ए-तालीम या शैक्षणिक संस्थेमार्फत जिल्हाभरात अनेक प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय चालविल्या जातात या संस्थेचे अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान आहे. पण गेल्या काही महिन्यापासून सदरील संस्थेच्या शाळेमध्ये अश्लील व्हिडिओ चित्रफित केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
मिल्लीया मुलांची माध्यमिक शाळेत सध्या निलंबित असलेला आमेर रफात कझी नावाच्या शिक्षकाने शाळेच्या परिसरात व वर्ग खोल्यात शाळेतील इतर महिला शिक्षिकांसोबत अश्लील व्हिडिओ चित्रफित केल्याचं धक्कादायक प्रकार समोर आले असून याप्रकरणी आमेर रफत काझी व इतर महिला शिक्षकांविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात दि. 09/12/2023 रोजी गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणे आमेर रफत काझी व इतर आरोपींना अद्याप अटक न झाल्याने पोलीसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
- वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे – धनंजय मुंडे
अश्लील व्हिडिओमध्ये संबंधित महिला शिक्षकांनी पवित्र हिजाब, बोबरखामध्ये शाळेच्या परिसरात अश्लील कृत्य केल्याने आमच्या धार्मिक भावना दुखायला गेले असून गुन्हा दाखल करता वेळेस धार्मिक भावना दुखवल्याची कलम दाखल झाली नसून ती कलम वाढविण्यात यावी.
अश्लील शिक्षक आमेर काझी हा अश्लील कृत्य करत असताना व्हिडिओ का करायचा ? सदरील व्हिडिओ हे अश्लील संकेतस्थळावर विकले आहे का ? याचे परदेशात काही कनेक्शन आहे का ? अश्लील व्हिडिओ प्रकरणात संस्थाचालक व शाळा प्रशासनने संबंधित महिला व पुरुष शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यास उशीर का लावला ? या प्रकरणी आणखी कीती शिक्षक सहभागी आहे ? असे अनेक प्रश्न आहेत जे उघडकीस आणण्यासाठी याप्रकरणी CID मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे.
अश्लील व्हिडिओ प्रकरणी आमेर रफत काझी व इतर अरोपीना अटक करुन मिल्लिया अश्लील व्हिडिओ प्रकरणाची क्राईम इव्हेंस्टीगेशन डिपार्टमेंट म्हणजे CID मार्फत चौकशी करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काळात जिल्हाधिकारी कार्यालया समोर लोकशाही मार्गाने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक सचिन सुरेश वाडकर साहेब यांना देण्यात आले. व त्याची प्रत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोच करण्यात आली यावेळी पठाण मोहब्बत खान,शकील खान बिल्डर,शेख युसुफ,शेख इफ्तेखर,शेख पशा भाई,सय्यद जाहेद,हमीद खान उर्फ बाबा खान,पठाण अमर जान सह इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply