बीड- नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी आपल्या भावाच्या भल्यासाठी पुरी नावाच्या गुत्तेदाराचा वापर सुरू केला आहे.गेल्या दीड दोन महिन्यात नगर परिषदेच्या वेगवेगळ्या कामावर तब्बल दीड ते दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पुरीच्या नावावर भावाची गुत्तेदारी सुरू असताना बोगस बिलावर स्वतः मुख्याधिकारी अंधारे या बिनधास्त सह्या करत आहेत. याबाबत काही माजी नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
बीड नगर पालिकेत प्रशासक राज आल्यानंतर बट्याबोळ झाला आहे.विशेषतः मुख्याधिकारी म्हणून नीता अंधारे आल्यानंतर त्यांनी बदनाम झालेल्या अन वादग्रस्त असलेल्या पगारे असोत की सलीम ट्रेसर यांच्या सारख्याना बीड ला आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
एवढ्यावरच न थांबता मुख्याधिकारी अंधारे मॅडम यांनी आपल्याच भावाला गुत्तेदारीत सेट करण्यासाठी आपली पद आणि प्रतिष्ठा पणाला लावली. नगर पालिकेत पाणी पुरवठा असो की स्वछता किंवा अन्य विभागात गुत्तेदारी करणाऱ्या पुरी नावाच्या व्यक्तीला त्यांनी हाताशी धरले.
- कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!
- पोलीस पाटलांची भरती सुरु!
- आजचे राशीभविष्य!
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
या पुरी महाशयांनी यापूर्वी कोट्यवधी रुपये नगर पालिकेच्या माध्यमातून छापले आहेत.अंधारे यांनी त्यांच्या लायसन वर जवळपास दीड ते दोन कोटी रुपयांची कामे मंजूर केली.विशेष म्हणजे काम मंजूर केल्यावर अवघ्या महिनाभरात ही कामे पूर्ण झाल्याचा अहवाल घेऊन बिले देखील काढण्यात आली.
ही कामे नेमकी कोणती आहेत अन कोणत्या कामावर कशी अन किती उधळपट्टी केली आहे हे आम्ही काम निहाय प्रकाशित करणार आहोत.दरम्यान बीड नगर परिषद मधील काही माजी नगरसेवक यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.
Leave a Reply