नागपूर- बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या दगडफेक, जाळपोळ प्रकरणात येत्या दोन दिवसात एसआयटी ची स्थापना केली जाईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आ संदिप क्षीरसागर यांच्या लक्षवेधी वर ते बोलत होते.
बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणात लक्षवेधी उपस्थित केली होती.
आ क्षीरसागर यांनी यावर बोलताना सांगितले की,30 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेपासून बीड शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जमावाने तोडफोड आणि जाळपोळ सुरू केली.माझ्या घरावर हल्ला करून जाळपोळ सुरू झाली तेव्हा पोलीस त्या ठिकाणी हजर होते. मात्र त्यांनीही कोणालाही रोखण्याचा प्रयत्न केला नाही.
तब्बल सात आठ तास हा धुडगूस सुरू होता.माझं कुटुंब घरात अडकल होतं, मी स्वतः पोलिसांना पाच दहा वेळी बोललो पण काहीही ऍक्शन घेतली गेली नाही.आ क्षीरसागर यांच्या लक्षवेधी वर बोलताना आ जयंत पाटील यांनी या प्रकरणात पपु शिंदे यांचे राजकीय कनेक्शन काय आहे हे सांगावे अस मत मांडले.
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
याबाबत उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची पाठराखण करताना दिन दिवसात एसआयटी स्थापन करू असे आश्वासन दिले.
Leave a Reply