परळी- आज परळी वैद्यनाथाच्या नगरीत शासन आलंय. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळे आलेत,व्यासपीठावर असलेले लोक पाहिल्यावर एकच वाक्य तोंडातून निघत ते म्हणजे माझीच नजर न लागो माझ्या या वैभवाला अस म्हणत राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
परळी येथे आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमात ना मुंडे बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की,आज व्यासपीठावर मी आणि ताई एकत्र आहोत,आ धस आणि आ आजबे एकत्र आहेत,भैय्यासाहेब आणि आ लक्ष्मण पवार एकत्र आलेत,त्यामुळे मुख्यमंत्री महोदय तुम्ही खरच एकनाथ आहात हे सिद्ध झालं आहे.
बीड जिल्ह्यातील परळी च्या प्रभू वैद्यनाथाचा विकास करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा.जिल्ह्याला विकास मार्गावर घेऊन जाण्यासाठी सर्वांनी भरभरून द्यावं.बीड जिल्ह्याच्या मातीतल्या माणसाच्या हातात मोठी ताकद आहे,तुम्ही त्याला ताकद दिली तर या जिल्ह्यातील शेतकरी संपन्न होईल.
दादा पहिल्यांदा तुम्ही उपमुख्यमंत्री असताना ,देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आणि ताई पालकमंत्री असताना जे दिलं त्यात एकनाथ शिंदे यांनी भर घालावी.
- कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!
- पोलीस पाटलांची भरती सुरु!
- आजचे राशीभविष्य!
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वांनी विकासाची गॅरंटी घ्यावी असे म्हणत मुंडे यांनी सर्वांचे आभार मानले.
Leave a Reply