नवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अर्थात लोकसभेच्या सेमिफायनलमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.मध्यप्रदेश राखताना भाजपने राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन राज्ये काँग्रेस कडून हिसकावून घेतली आहेत.मध्यप्रदेश मध्ये तब्बल 162 जागांवर तर राजस्थान मध्ये भाजप 111 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे.
राजस्थानमध्ये १९९ जागा असून त्यात भाजप ११०, काँग्रेस ७३ तर इतर १६ जागेवर हे पक्ष आघाडीवर आहे. तर मध्यप्रदेशमध्ये २३० पैकी भाजप १६१, काँग्रेस ६६, इतर ३ जागेवर हे पक्ष आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्ये ९० जागा असून त्यात भाजप ५४, काँग्रेस ३४ इतर २ आघाडीवर आहे. तेलंगणामध्ये ११९ जागा असून काँग्रेस ६५, बीएसआर ३९, या जागेवर आघाडीवर आहे.
गेल्या महिनाभरात पाच राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला होता.स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी या पाचही राज्यात अनेक सभा घेतल्या होत्या.पाचपैकी चार राज्यातील निवडणुकीचे मतमोजणी रविवारी झाली.
- मुंडे पुन्हा त्याच पदावर यावेत -महंत नामदेव शास्त्री!
- वीस लाखापासून ते सत्तर लाखापर्यंत रेट!
- आजचे राशीभविष्य!
- जिल्ह्यात एक हजार कोटीचे उद्योग येणार!
- आजचे राशीभविष्य!
सकाळपासून निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत.पोस्टल बलेट च्या मोजणी मध्ये चार पैकी तीन राज्यात भाजपने आघाडी घेतली तर तेलंगणा मध्ये काँग्रेस ने बीआरएस ला धक्का देत बहुमत मिळवले आहे.
Leave a Reply