बीड- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून नागनाथ शिंदे जॉईन झाले अन त्यांच्या कार्यालयातील तिघांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली. न्यायालयाचा अवमान केल्याने सीईओ अविनाश पाठक यांनी ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.न्यूज अँड व्युज ने यापूर्वी या प्रकरणात आवाज उठवला होता.
बीडच्या शिक्षण विभागात सगळा सावळा गोंधळ सुरू आहे.सहायक प्रशासन अधिकाऱ्यांपासून ते शिपायापर्यंत सगळेच मनाचे मालक झाले आहेत.शिक्षण विभागातील कारभाराचे वाभाडे न्यूज अँड व्युज ने वारंवार उघड केलेले आहेत.
शिक्षण विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील पाच शिक्षकांच्या पदोन्नती चा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होता.याबाबत अनेकवेळा शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करून सुद्धा काहीच कारवाई न झाल्याने या शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
त्यानंतर न्यायालयाने याबाबत पदोन्नती चे आदेश देखील दिले मात्र मस्तवाल कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. याबाबत न्यायालयाने सीईओ यांना न्यायालयाच्या आदेशाची अवमाणना केल्यामुळे नोटीस काढली.
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
ही नोटीस प्राप्त होताच बीडचे सीईओ अविनाश पाठक यांनी सहायक प्रशासन अधिकारी गिरीश बीजलवाड ,कनिष्ठ प्रशासन अधिकारी माधव नायगावकर आणि वरिष्ठ सहायक एस सी आखाडे या तीन अधिकारी ,कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.
बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी हे गुरुवारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.त्यांच्या जागी तातडीने माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला.परळी येथे जाऊन परवानगी घेऊन शिंदे बीडमध्ये जॉईन झाले अन लगेच अर्ध्या एक तासात तीन कर्मचारी सस्पेंड झाल्याने खळबळ उडाली आहे.
Leave a Reply