बीड- बीड शहरात तब्बल तासभर पडलेल्या अवकाळी पावसाने दाना दान उडाली नगरपालिका प्रशासन कशा पद्धतीने बेभरौसी कारभार करते याचे मूर्तीमंत उदाहरण या पावसात पाहायला मिळाले बीडच्या राजकीय मंडळींची इज्जत नाल्यातील पाण्यामधून वाहताना दिसून आली अक्षरशः बीड शहराच्या विविध भागांमध्ये नदी वाहते की काय अशी परिस्थिती या तासाभराच्या पावसाने निर्माण झाली होती राजकारणांना मात्र याचे काहीही सोयर सुतक नाही हा भाग निराळा.






बीड शहरासह जिल्ह्यात काही भागात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली अक्षरशः पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीने धो धो पाऊस कोसळतो त्याच पद्धतीने शुक्रवारी मुसळधार पाऊस बरसला या पावसामुळे भाजी मंडई सुभाष रोड माळीवेस धोंडीपुरा राजुरी वेस् जालना रोड सम्राट चौक नगर रोड तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नालीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे रस्त्याला नदी आणि तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते
बीड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकाला तर चोहोबाजूंनी पाण्याने वेढ्याचे चित्र दिसून आले बीड शहरातील पेठ बीड भाग असो किंवा बार्शी नाका अथवा नगर रोड किंवा जालना रोड कोणताच भाग असा नव्हता जेथे नालीतील पाणी रस्त्यावर आल्यामुळे घाण आणि दुर्गंधी पसरली नव्हती गेल्या काही महिन्यांपासून बीड नगरपालिकेवर अधिकाऱ्यांचे प्रशासकीय राज आहे या अधिकाऱ्यांनी बीड शहरातील नाल्यांची स्वच्छता आणि साफसफाई याची कशी वाट लावली आहे हे या पावसाने उघडकीस आणले आहे
एकीकडे गल्लीत चार टोपले सिमेंट टाकले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून गावभर बोंब मारत क्रेडिट घेणारे नेते यांचे देखील हे अपयश असल्याचे दिसून आले कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणण्याचा दावा करणारे हे लोकप्रतिनिधी आणि त्यांचा विकासाचा दावा नालीच्या पाण्यात वाहून जाताना बीडकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला प्रत्येक भागातील नाल्या तुंबल्यामुळे गटारीचे घाण पाणी अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात नागरिकांच्या घरात घुसल्याचे पाहायला मिळाले अवकाळी पावसाने जर बीड शहराची अशी दाणा दान उडवली असेल तर पावसाळ्याच्या सिझनमध्ये बीड करांचे काय हाल होतील याचा विचार न केलेलाच बरा आता तरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी आणि त्यांचे प्रशासन कामाला लागेल का आणि शहरवासी यांच्या नशिबी स्वच्छ हा जो अस्वच्छतेचा कलंक लागला आहे तो धुऊन काढणार का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे
Leave a Reply