नवी दिल्ली-भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंडर-19 आशिया कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या उदय सहारनकडे या संघाची कमान सोपवण्यात आली आहे.यामध्ये बीडच्या सचिन संजय धस याची निवड झाली आहे.भारतीय संघात निवड झालेला सचिन हा बीड जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.त्याच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
दुबईच्या यजमानपदावर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेला 8 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना रविवारी 17 डिसेंबर रोजी होणार आहे.
भारतीय संघ अंडर-19 आशिया कपचा गतविजेता आहे. म्हणजेच याआधी गेल्या मोसमात भारताने विजेतेपद पटकावले होते. भारताचा अंडर-19 संघ हा स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. अंडर-19 भारतीय संघाने सर्वाधिक 8 ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत.
- नागपूरपेक्षा मोठा शिक्षक घोटाळा बीडमध्ये!एस आयटी मार्फत चौकशीची गरज!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- परळी रेल्वे स्टेशन पुनर्विकासासाठी 25 कोटी!
अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेल्ली अवनीश राव, सौम्य कुमार, मुर्गन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौड, आराध्या शुक्ला, नमम तिवारी.
Leave a Reply