जालना- अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषण स्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली होती. या दगडफेकीच्या घटनेतील आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.या दगडफेकीचे कनेक्शन थेट गेवराई पर्यंत पोहचले असून बेदरे सह चार जण पोलिसांनी अटक केले आहेत.आरोपीकडून पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
ऋषिकेश बेदरेवर गोंदी पोलीस ठाण्यात कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध घेत असताना तो इतर 2 साथीदारांसह आढळून आला होता. पोलिसांनी त्यांच्यावर 307 कलमातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी ऋषीकेश बेद्रे (43),निलेश राठोड,(42) ,शनिदेव शिरसठ( 22) कैलास सुरवसे (41 ) यांना ताब्यात घेतलं आहे. अंतरवाली सराटी येथील जाळपोळ प्रकरणात ताब्यात असलेल्या चारही जणांचा हात असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेद्रे यांच्याकडे गावठी पिस्तूलासह 2 जिवंत काडतुसे सापडली आहेत.
- वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे – धनंजय मुंडे
जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या उपोषणास्थळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर झालेल्या दगडफेकीच्या संदर्भात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडे पोलिसांकडून गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस आढळून आली आहेत.
Leave a Reply