बीड- बीड जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेली म्हणजेच ग्रामविकास विभागाकडे असलेली पंचायत समिती बीडची जागा मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने हालचाली सुरू केल्या आहेत.याबाबत जिल्हा परिषदेचे सीईओ यांना जिल्हाधिकारी यांनी एका पत्राद्वारे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली आहे.विशेष बाब म्हणजे सदरील जागा हस्तांतरित करण्याचे अधिकार सीईओ यांना नसताना हे पत्र त्यांना पाठवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्या 30 ते 40 वर्षापासून नगर रोड भागात असलेल्या पंचायत समिती कार्यालयाच्या स्थलांतर नवीन इमारतीत झाल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून जुन्या पंचायत समितीची जागा रिकामी पडून आहे ही जागा तालुका क्रीडा संकुलासाठी मिळावी यासाठी देखील प्रयत्न सुरू होते
दरम्यान बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी जुन्या पंचायत समितीच्या दीड एकर जागेवर बीडचे तहसील कार्यालय,बीडचे उपविभागीय कार्यालय आणि नवीन कृषी भवन उभारण्यासाठी ही जागा हस्तांतरित करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे.
- मुंडे पुन्हा त्याच पदावर यावेत -महंत नामदेव शास्त्री!
- वीस लाखापासून ते सत्तर लाखापर्यंत रेट!
- आजचे राशीभविष्य!
- जिल्ह्यात एक हजार कोटीचे उद्योग येणार!
- आजचे राशीभविष्य!
तब्बल दीड एकर जागा ही आजच्या घडीला ग्रामविकास विभागाकडे म्हणजेच जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे.ही जागा महसूल विभागाच्या ताब्यात घेण्यासाठी ग्रामविकास विभागाची परवानगी मिळणे आवश्यक आहे. मात्र जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना नाहरकत साठी पत्र दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Leave a Reply