बीड- बीड जिल्ह्यातील अनेक मल्टिस्टेट अन पतसंस्था अचानक बंद होऊ लागल्या आहेत,त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब ठेवीदार मात्र भिकेला लागत आहेत.जिजाऊ माँ साहेब, ज्ञानराधा नंतर मंगळवारी साईराम अर्बन बंद झाल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे बीड तालुक्यातील आणखी एक मल्टिस्टेट बंद होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या मल्टिस्टेट मध्ये बीड जिल्ह्यातील काही गडाचे कोट्यवधी रुपये आहेत,हे पैसे या मल्टिस्टेट मालकांनी गूळ कारखाना किंवा प्लॉटिंग च्या व्यवसायात गुंतवल्याने ठेवीदारांना आपल्याच पैशासाठी खेटे घालावे लागत आहेत.यामध्ये नेमका कोणाचा बळी जाणार हे लवकरच स्पष्ट होईल.
गेल्या वर्षभरापासून बीड जिल्ह्यातील अनेक मल्टिस्टेट अन पतसंस्था आर्थिक कारभारातील गैरव्यवहार केल्यामुळे अडचणीत आल्या आहेत.परिवर्तन असो की मातोश्री अथवा जिजाऊ माँ साहेब किंवा ज्ञानराधा या पतसंस्था मध्ये अनियमितता झाल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत.
मंगळवारी बीड सह वीस शाखा असलेली साईराम अर्बन पतसंस्था बंद झाली अन पुन्हा एकदा मल्टिस्टेट अन पतसंस्था च्या व्यवहाराबद्दल चर्चा सुरू झाली.बीड तालुक्यातील आणखी एक पतसंस्था आर्थिक दृष्टया अडचणीत आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीड,नेकनूर सह राजुरी सर्कल मध्ये शाखांचे जाळे असलेल्या या पतसंस्थेत बीड मधील काही गडांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत.साईराम असो की ज्ञानराधामध्ये सुद्धा काही गडांचे पैसे अडकले आहेत.गडाचे कोट्यवधी रुपये कर्ज स्वरूपात वाटप करण्याऐवजी या पतसंस्थेच्या मालकांनी गूळ कारखाना किंवा प्लॉटिंग मध्ये हे पैसे गुंतवले आहेत.
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
- आजचे राशीभविष्य!
- आ क्षीरसागर यांची बदनामी, बीडमध्ये गुन्हा दाखल!
ज्ञानराधामध्ये ठेवीदारांची गर्दी वाढल्यानंतर बीडच्या ज्या मल्टिस्टेट मध्ये गडाचे अन सामान्य ठेवीदारांचे पैसे आहेत त्यांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली आहे. मात्र त्यांना वेळेवर पैसे मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विशेष बाब म्हणजे बीडच्या या पतसंस्थेच्या व्यवहाराची इन्कम टॅक्स विभागाकडून देखील चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.लोकांच्या पैशावर महागड्या गाड्या,करोडो रुपयांची जमीन,प्लॉट घेणाऱ्या या मालकांना आता ठेवीदारांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.
Leave a Reply