बीड- बीड शहरासह जिल्ह्यात तब्बल वीस शाखा असलेल्या साईराम अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखा अचानक बंद झाल्याने ठेवीदारामध्ये खळबळ उडाली आहे. साईराम चे मालक शाहिनाथ परभने यांच्या मालकीचे परभने स्टील हे दुकान देखील बंद असून त्यांचा मोबाईल बंद लागत असल्याने ठेवीदारांनी संताप व्यक्त केला आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जिजाऊ माँ साहेब पतसंस्था असो की ज्ञानराधा अथवा परिवर्तन किंवा इतर काही पतसंस्था यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाल्याने या पतसंस्था बंद झाल्या.ज्ञानराधामध्ये गर्दी वाढू लागल्यानंतर सुरेश कुटे यांनी काही दिवसात पैसे परत करण्याचा शब्द दिला आहे.
- वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे – धनंजय मुंडे
दरम्यान बीड शहरातील माळीवेस भागात मुख्य शाखा असलेल्या साईराम अर्बन या पतसंस्थेच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखा बंद असल्याने ठेवीदारांनी मुख्य शाखेसमोर गर्दी केली आहे.
हजारो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी जादा व्याजदराचे आमिष दाखवून घेण्यात आल्या.मात्र हा पैसा कर्ज रुपात न वाटता या पतसंस्थेच्या मालकांनी स्वतःच्या उद्योगात वापरला त्यामुळे साइराम बंद झाली आहे.
परभने यांचे माळीवेस भागात तीन मजली परभने स्टील नावाचे दुकान आहे,हे दुकान देखील बंद असून त्यांचा मोबाईल देखील बंद आहे.
Leave a Reply