बीड- आपल्या संस्थेतील एक शिक्षक त्याच्या अश्लील कृत्यामुळे सगळ्या गावाला माहीत होतो,त्याची पत्नीच त्याच्या विरुद्ध आवाज उठवते मात्र संबंधित संस्था त्याच्यावर कोणतीच कारवाई करत नाही.यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का? पण हा प्रकार घडला आहे बीडच्या अंजुमन इशात ए तालीम च्या मिलिया शाळेत.आमीर काझी या शिक्षकाच्या (सेक्सगुरु) प्रकरणात मिलियाच्या संपूर्ण मॅनेजमेंट ने कानावर हात अन तोंडावर बोट ठेवल्याने या नराधमाची हिंमत आणखीनच वाढली.
बीड शहरातील शहेनशहा नगर भागात राहणाऱ्या आमीर काझी या मिलिया शाळेतील शिक्षकावर त्याच्याच पत्नीकडून लैंगिक छळाची तक्रार झाल्याने एकच खळबळ उडाली. हे प्रकरण गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.
आमीर काझी याच्या कृष्णकृत्याबाबत संपूर्ण बीड शहराला आणि मिलियाच्या बीड,अंबाजोगाई, परळी यासह इतर शाळा महाविद्यालयात देखील माहिती होती.परंतु या प्रकरणी ना संस्थेने काही कारवाई केली ना मॅनेजमेंट ने.उलट ज्याने कोणी याबाबत विचारणा केली त्यांनाच खोटे पाडण्याचा प्रकार घडला आहे.
- वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे – धनंजय मुंडे
न्यूज अँड व्युज ने तीन चार दिवसांपूर्वी याबाबत बातमी प्रकाशित केली अन एकच खळबळ उडाली. आमीर काझी याने जवळपास चाळीस ते पन्नास महिलांचा छळ केला असल्याची चर्चा आहे.जी संस्थाचालकांच्या देखील कानावर होती.पण त्यांनी याकडे कानाडोळा केला.आता याबाबत बोंबाबोंब सुरू झाल्यानंतर देखील संस्थेने मीडिया समोर येऊन आपली भूमिका विशद केलेली नाही हे विशेष.एकप्रकारे संस्था आमीर काझी याच्या कृत्याचे समर्थन करत असल्याचे दिसून येत आहे.
Leave a Reply