बीड- शहरातील प्रथितयश असलेल्या मिलिया शाळेतील शिक्षक आमीर काझी याने त्याच्या पत्नीसोबतचे तसेच इतर महिलांसोबत अश्लील चाळे करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत या सेक्सगुरुच्या पत्नीने शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तक्रार करत कारवाईची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र हा सगळा प्रकार माहीत असून सुद्धा मिलिया हायस्कुल ने या शिक्षकाला का पाठीशी घातले आहे हे न उलगडणारे कोडे आहे.
बीडमधील एका शाळेतील शिक्षकाने आपल्या पत्नीसह इतर महिलांसोबत अश्लील चाळे करतानाचे व्हिडीओ तयार केल्याची बातमी न्यूज अँड व्युज ने प्रकाशित केल्यानंतर एकच खळबळ उडाली. अनेकांनी हा शिक्षक आणि त्याला पाठीशी घालणारी संस्था कोण याबाबत विचारणा केली.
- वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे – धनंजय मुंडे
याबाबत अधिक माहिती घेतली असता या आमीर काझी नामक शिक्षकाने 2012 ते 2023 या काळात अनेक महिलांची फसवणूक करत त्यांच्यासोबत अश्लील चाळे केल्याचे समोर आले आहे.या महिलांना ब्लॅकमेल करत या काझी ने मोठी रक्कम जमा केली.
हा सगळा प्रकार पत्नीच्या लक्षात आल्यानंतर तिने याबाबत तिच्या वडिलांकडे तक्रार केली.जावयाच्या या कारनाम्यामुळे हैराण झालेल्या सासऱ्याने जाब विचारला तेव्हा काझी ने त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केला.
त्यानंतर या सेक्सगुरुच्या पत्नीने याबाबत संस्थेकडे तक्रार केली परंतु संस्थेने त्याला पाठीशी घालत कारवाई करण्यास टाळाटाळ केली.त्यामुळे या प्रकरणात थेट छत्रपती संभाजी नगरयेथील शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तक्रार केली आहे.
आपल्याच शाळेतील एक शिक्षक हा शिक्षकी पेशाला काळिमा फासत संस्थेची बदनामी होईल असे कृत्य करत असताना मिलिया शाळेच्या प्रशासनाने कोणतीही कारवाई का केली नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे.तब्बल दहा बारा वर्षांपासून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या या नराधम सेक्सगुरु विरुद्ध बडतर्फीची कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
Leave a Reply