बीड- ग्रामीण भागातील देवस्थानच्या जमिनी राजकीय पुढारी अन कार्यकर्त्यांनी हडप केल्याची अनेक उदाहरणे आपण आजवर पाहिली मात्र शहरातील मध्यवस्तीत असलेल्या महादेवाच्या मंदिराची जमीन हडपण्याचा प्रकार समोर आला आहे.बीड शहरात नगरी,रेसिडन्सी उभारणाऱ्या या भूमाफियाने आता देवाला अन त्याच्या नावावर असणाऱ्या जमिनी लुटण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.कृष्ण मंदिर मागील महादेवाच्या ( कलिंडेश्वर ) मंदिराची आठ ते दहा एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न या भूमाफियाने केला आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी,पाटोदा,शिरूर,परळी,अंबाजोगाई, केज ,बीड ,गेवराई या तालुक्यातील हजारो एकर देवस्थान अन वक्फ च्या जमिनी स्थानिक पुढाऱ्यांनी खालसा करत स्वतःच्या,संस्थांच्या ,जवळच्या नातेवाईकांच्या नावावर केल्या.
आष्टी तालुक्यातील जमिनी प्रकरणात तर विद्यमान आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला.बीड तालुक्यातील नामलगाव येथील जमीन प्रकरणात देखील गुन्हे दाखल झाले.
हा झाला ग्रामीण भागातील जमिनी बळकवण्याचा भाग.मात्र बीड शहरात ,मध्यवस्तीत असलेलं एक महादेवाचं मंदिर अलीकडच्या काळात प्रसिद्धीच्या झोतात आलं.कलिंदेश्वर नावाच्या या महादेव मंदिराची स्थापना पुराण काळातील असल्याचं पाहताक्षणी दिसतं. या मंदिराच्या जागेवर एका धनिकाचा डोळा गेला,कारण शेजारीच त्याने रेसिडन्सी चे मोठमोठे टॉवर उभारले आहेत.
- मुंडे पुन्हा त्याच पदावर यावेत -महंत नामदेव शास्त्री!
- वीस लाखापासून ते सत्तर लाखापर्यंत रेट!
- आजचे राशीभविष्य!
- जिल्ह्यात एक हजार कोटीचे उद्योग येणार!
- आजचे राशीभविष्य!
आता या भु माफियाने महादेवाच्या मंदिर परिसराला कंपाऊंड टाकले असून ही जवळपास आठ ते दहा एकर जमीन स्वतःच्या ताब्यात घेतली आहे.ही जमीन इनामी असल्याने त्याची खरेदी विक्री होत नाही,मात्र या भूमाफियाने अधिकारी अन पुढारी खिशात घातलेले आहेत,ज्याच्यामुळे त्याने ही देवाची जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला आहे.
Leave a Reply