मुंबई- सलग नऊ सामने जिंकून सेमिफायनलमध्ये धडक मारलेल्या भारताने न्यूझीलंड चा मोठा पराभव करत विश्वचषक 2023 च्या फायनलमध्ये धडक मारली. विराट कोहलीने शतकाचे अर्धशतक केले तर मोहम्मद शमीने सात विकेट घेत भारताला विजयी केले.
वानखेडे स्टेडियम येथे नाणेफेक जिंकून रोहित शर्माने फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करत 29 चेंडूत 47 धावा केल्या.त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने शुभमन गिल सोबत मोठी भागीदारी केली.गिल रिटायर्ड झाल्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर ने विराट सोबत डाव सावरला.विराट कोहलीने सचिन तेंडुलकर चा 49 शतकांचा रेकॉर्ड मोडत 50 वे शतक केले.
विराट पाठोपाठ श्रेयस ने देखील आपले शतक केले.पहिला विश्वचषक खेळणाऱ्या श्रेयस ने अवघ्या 67 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.भारताने विजयासाठी न्यूझीलंड समोर 389 धावांचे टार्गेट दिले.
- आजचे राशीभविष्य!
- घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
- आजचे राशीभविष्य!
- आ क्षीरसागर यांची बदनामी, बीडमध्ये गुन्हा दाखल!
- आजचे राशीभविष्य!
न्यूझीलंड च्या डावाची सुरवात अडखळत झाली. मोहम्मद शमीने सुरवातीला दोन धक्के दिल्यानंतर केन विल्यम्सन ने मिचेल सोबत डाव सावरला.69 धावांवर विल्यम्सन बाद झाल्यानंतर शमीने त्याच ओव्हरमध्ये चौथी विकेट घेतली.त्यानंतर न्यूझीलंड चा डाव सवरलाच नाही.
Leave a Reply