बीड- बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून बीडमध्ये पुन्हा एकदा काका जयदत्त क्षीरसागर आणि पुतण्या आ संदिप क्षीरसागर यांच्यातील लढत पाहायला मिळत आहे.शुक्रवारी मतदान सुरू झाल्यानंतर शेकडो मतदार हे खाजगी ट्रॅव्हल बसमधून उतरतानाचे दृश्य पाहायला मिळाले.हे सगळे आ संदिप क्षीरसागर समर्थक मतदार होते हे विशेष.
बीड जिल्ह्यातील गेवराई, परळी,अंबाजोगाई, माजलगाव, बीड,केज,पाटोदा या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक सुरू आहेत.बीडमध्ये आ संदिप क्षीरसागर आणि काका जयदत्त क्षीरसागर या दोघांमध्ये लढत होत आहे तर गेवराईत माजी आ अमरसिंह पंडित आणि विद्यमान आ लक्ष्मण पवार यांच्यात आणि परळी बाजार समितीत माजीमंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सरळ लढत होत आहे.
शुक्रवारी मतदानाला सुरवात झाल्यानंतर बीड,पिंपळनेर आणि मांजरसुम्बा या मतदान केंद्रावर खाजगी ट्रॅव्हल्स बसमधून मतदार उतरतानाचे दृश्य पाहायला मिळाले.बीड बाजार समितीच्या एक ते दीड हजार मतदारांना चार दिवसांपासून आ संदिप क्षीरसागर यांनी अज्ञात स्थळी नेऊन ठेवले होते.मतदानाच्या दिवशी थेट हे सगळे केंद्रावर दाखल झाले.
शेकडो मतदार आणि त्यांचे समर्थक आ संदिप क्षीरसागर यांच्या बाजूने असल्याचे चित्र तिन्ही केंद्रावर दिसून आले.शनिवारी होणाऱ्या मतमोजणी नंतर निकाल काय लागणार हे स्पष्ट होईल मात्र मतदान केंद्रावरील चित्र आ संदिप क्षीरसागर यांच्या बाजूने वातावरण असल्याचे दाखवणारे होते.
Leave a Reply