बीड- आरक्षणाच्या मुद्यावरून बीडमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर लावण्यात आलेली संचारबंदी बुधवारी पहाटे सहा वाजेपासून शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे हळूहळू व्यापार पूर्वपदावर येत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. मात्र इंटरनेट सेवा बंद असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
बीड जिल्ह्यात सोमवारी बीड,परळी,माजलगाव,वडवणी, आष्टी पाटोदा ,गेवराई या भागात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या.अनेक राजकिय नेत्यांचे कार्यालय आणि घर पेटवून देण्यात आले.त्यामुळे प्रशासनाने सोमवारी रात्रीपासून अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली होती.तसेच इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती.
दरम्यान सोमवारी रात्रीपासून पोलिसांनी शंभर पेक्षा अधिक आरोपीना अटक केली.त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.मंगळवारी रात्री प्रशासनाने बुधवारी पहाटेपासून संचारबंदी शिथिल करण्याचा निर्णय घेतला.
- नागपूर घोटाळ्यानंतर शिक्षण विभागाला खडबडून जाग!
- आजचे राशीभविष्य!
- कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!
- पोलीस पाटलांची भरती सुरु!
- आजचे राशीभविष्य!
त्यानंतर बुधवारी सकाळ पासून व्यापरपेठ उघडण्यास सुरुवात झाली. सध्या बीड शहरासह जिल्ह्यात शांतता आहे.
Leave a Reply