बीड- तुम्ही मेहनतीने कमावलेला पैसा जेवढा राष्ट्रीयीकृत बँकेत सुरक्षित आहे तेवढा कुठेच नाही,मात्र तरीही हजारो,लाखो लोक मल्टिस्टेट, पतसंस्था आणि अर्बन निधी च्या नादी लागून वाटोळे करून घेतात.या मल्टिस्टेट वाल्यानी एक नवा फंडा शोधला आहे.जिल्ह्यातील देवस्थान, गड यांच्या महाराजांना हाताशी धरायचे अन कोट्यवधी रुपयांचा धंदा करायचा असा उद्योग बीडमध्ये जोरात सुरु आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाने या मल्टिस्टेट च्या गोरख धंद्याची तपासणी सुरू केली आहे.
बीड जिल्ह्यात परिवर्तन असो की शुभमंगल अथवा स्वराज किंवा जिजाऊ माँ साहेब या सगळ्या पतसंस्था नी ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावला.मल्टिस्टेट असोत की पतसंस्था यांचा व्यवहार सुरवातीपासूनच संशयास्पद राहिला आहे.पतसंस्था सुरू केली की वर्षभरात चेअरमन, संचालक आणि त्यांचे कुटुंबीय यांची भरभराट डोळ्यात उठून दिसते.
बीडच्या अनेक पतसंस्था ज्यांच्या नावात राम किंवा गणेश आहे,अथवा देवीचं नाव आहे किंवा लोकांच्या आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती याचं नाव आहे यांच्याकडे देखील हाच मामला आहे.या पतसंस्था चालकांनी कुठल्या का होईना एका देवस्थान अथवा गडाच्या महाराजांना हाताशी धरले आहे.
गेवराईच्या गणेशवर इन्कम टॅक्स ची रेड अन बीडच्या गणेश पर्यंत कनेक्शन ! लवकरच भांडाफोड !! आय टी रेड अन मल्टिस्टेट चा घोळ !!
प्रत्येक गडाला आसपासच्या गावातील भाविक भक्त कोट्यवधी रुपये देणगी देतात.ही देणगी राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवण्या ऐवजी या महाराज किंवा महंत लोकांनी पतसंस्था अथवा मल्टिस्टेट मध्ये ठेवली आहे.विशेष म्हणजे यातील काही मल्टिस्टेट वाले या गड अथवा देवस्थानचे ट्रस्टी आहेत.
बीड जिल्ह्यातील वाढते पतसंस्थे आणि मल्टिस्टेट बंद होण्याच्या तक्रारी थेट केंद्रीय सहकार विभागपर्यत पोहचल्या आहेत.काही मल्टिस्टेट मध्ये गडाचे पैसे लावले असल्याने इन्कम टॅक्स विभागाकडून चौकशी सुरू आहे. लवकरच या मल्टिस्टेट अन गडाची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Leave a Reply