बीड- बीड शहर किंवा तालुक्यातील अथवा जिल्ह्यातील जेवढ्या पतसंस्था किंवा मल्टिस्टेट आहेत ज्यांच्या अनेक शहरात,जिल्ह्यात शाखा आहेत त्यांचा व्यवहार हवाला सारखा आहे.बेकायदेशीर पणे एका शहरातून दुसऱ्या शहरात पैसे पोहचवण्याचा उद्योग हे लोक करतात .हजारो ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या पैशावर मालक पुणे,मुंबई पासून दुबई पर्यंत प्रॉपर्टी घेत आहेत अन ठेवीदार मात्र पैशाची वाट पहात आहेत.
बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर मल्टिस्टेट आणि पतसंस्था बंद झाल्याची उदाहरणे घडली आहेत.शुभकल्याण असो की मातोश्री अथवा जिजाऊ माँ साहेब किंवा परळीची स्वराज पतसंस्था या सगळ्यांनी बीड जिल्ह्यातील हजारो ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून देशोधडीला लावले आहे
गेवराईतील इन्कम टॅक्स रेड चे बीडमधील मल्टिस्टेट सोबत कनेक्शन ! लवकरच भांडाफोड !!
मल्टिस्टेट किंवा पतसंस्था चा परवाना मिळाला की सुरवातीला ग्राहकांच्या हातापाया पडून ठेवी गोळा करायच्या अन एकदा का धंदा सेट झाला की खाजगी सावकारकी सुरू करायची असले उद्योग या लोकांनी सुरू केले आहेत.
- नागपूर घोटाळ्यानंतर शिक्षण विभागाला खडबडून जाग!
- आजचे राशीभविष्य!
- कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!
- पोलीस पाटलांची भरती सुरु!
- आजचे राशीभविष्य!
बहुतांश मल्टिस्टेट आणि पतसंस्था म्हणजे हवाला रॅकेट चालवणारी दुकाने झाली आहेत.बीड असो की छत्रपती संभाजी नगर इथपासून ते दिल्लीपर्यंत कोठूनही तुम्हाला पाच मिनिटात पैसे हवे असतील तर हवाला मार्फत मागवले जातात.मात्र अलीकडच्या काळात हा धंदा या मल्टिस्टेट वाल्यांनी सुरू केला आहे.लाखाला किमान दोन हजार कमिशन घेऊन हा धंदा बिनबोभाट सुरू आहे.
पतसंस्थेतून खाजगी सावकारकी देखील जोरात सुरू आहे.ठेवीदारांचे पैसे शिक्षण संस्था,साखर कारखाने,गुळाचे कारखाने,जमीन, प्लॉटिंग शेयर मार्केट यामध्ये गुंतवले जातात.मात्र ठेवीदारांच्या गरजेला हे पैसे मिळत नाहीत.विशेष म्हणजे यावर ज्यांनी नियंत्रण ठेवायला पाहिजे ते सहकार विभागाचे अधिकारी देखील डोळेझाक करतात त्यामुळे हा हवालाचा धंदा जोरात सुरू आहे.
Leave a Reply