बीड- बदली होऊन पदभार सोडल्यानंतर बीड शहरातील सर्व्हे नंबर 35 मधील जागेचे बोगस कागदपत्रांच्या आधारावर ले आउट मंजूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश झालेल्या मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे प्रकरणात चौकशी करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली.
बीड शहरातील नाट्यगृहासमोर असलेल्या बागलाने इस्टेट येथील 15650 चौरस मीटर क्षेत्रावर अभिण्यास मंजूर केल्या प्रकरणात शासनाने बीडचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन अधिकारी नगर परिषद यांना दिले होते.
4 ऑक्टोबर रोजी शासनाने आदेश दिल्यानंतर सुद्धा या प्रकरणात जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.त्यामुळे गुट्टे हे न्यायालयात गेले अन त्यांनी या आदेशाला स्थगिती मिळवली.याबाबत बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याकडे माहिती विचारली.तेव्हा त्यांनी या प्रकरणात काय कारवाई झाली,कोण दोषी आहे याचा चौकशी चे आदेश दिले जातील असे पत्रकारांना सांगितले.
सर्व्हे न 35 प्रकरण नेमकं काय आहे ……..!
चाणक्य पुरी शेजारी असलेल्या पारनेरकर महाराज यांच्या मंदिरासमोर बागलाने यांची मोकळी जागा आहे.ही जागा बीडमधील काही भूमाफियांनी खरेदी करण्याचा डाव आखला.यामध्ये बीड नगर परिषद चे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे यांना सामील करून घेण्यात आले.सार्वजनिक उद्यानासाठी आरक्षित असलेली ही जागा या भूमाफियांनी मूळ मालकाला अंधारात ठेवून हडप करण्याचा डाव आखला.त्याला गुट्टे यांनी साथ दिली.याबाबत थेट मंत्रालयात तक्रारी झाल्या. अखेर 4 ऑक्टोबर2023 रोजी शासनाने गुट्टे हे दोषी असल्याचे सिद्ध झाल्यामुळे गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढले.
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
गुट्टे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश झाल्याने हा भूखंड हडप करण्यासाठी प्लॅनिंग करून कोट्यवधी रुपये अडकवणारे भूमाफिया मात्र हवालदिल झाले आहेत.
Leave a Reply