ठाणे- आरक्षण प्रश्नावर 25 पासून आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील देवीच्या मंदिरात दर्शनांनातर पत्रकारांशी संवाद साधला. देवीची शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाला आरक्षण देणारच असा शब्द त्यांनी दिला.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की ,सारथी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत मिळणाऱ्या सुविधांसंदर्भात मराठवाड्यात कॅम्प घेण्यात येणार आहेत. मी मराठा समाजाचा आहे. शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे मला मागण्यांची जाणीव आहे. मी कधीही खोटं बोलत नाही, दिलेला शब्द पाळणारा मी माणूस आहे.. कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मराठा समाजाला देण्याची जबाबदारी सरकारची आहे, ते देण्यात येईल. दुसऱ्या समाजावरही अन्याय होणार नाही”
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
मुख्यमंत्री बोलले की, मराठा समाजाला सरकार काय देतं, याचा उल्लेख आजच्या जाहिरातीलमध्ये केला आहे. साडेआठ टक्के आरक्षण मराठा समाजाचे तरुण घेतात, हे चांगलं आहे. आज मी देवीच्या मंडपात शब्द देतोय, खोटं बोलणार नाही.. मराठा समाजाची दिशाभूल करणार नाही
Leave a Reply