बीड- अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोणत्याही प्रकारचे गुन्हे नसल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याला ओळखत असल्याचे साक्षांकन करणाऱ्या तत्कालीन समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ सचिन मडावी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीड जिल्हा परिषदमध्ये 2019 साली आदित्य अनुप धनवे याला अनुकंपावर नोकरी लागली.मात्र त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा असल्याची आणि जेलमध्ये राहिल्याची माहिती त्याने दडवली.जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने देखील याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला.
दरम्यान मागील आठवड्यात आदित्य धनवे ला दहा वर्षांची शिक्षा झाली.त्यानंतर न्यूज अँड व्युजने हे प्रकरण उघडकीस आणले.त्यावर जिल्हा परिषदेचे सीईओ अविनाश पाठक यांनी त्याला तातडीने निलंबित केले.
धनवे याला चारित्र्य प्रमाणपत्र देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि त्यावर सदरील उमेदवारास ओळखत असल्याचे आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे नसल्याचे ओळख प्रमाणपत्र देणारे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांच्या कारभाराची सीईओ पाठक यांनी चौकशी केली.
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
यामध्ये सकृतदर्शनी सहायक आयुक्त डॉ सचिन मडावी हे दोषी असल्याचे समोर आल्यानंतर पाठक यांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस शासनाकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान या प्रकरणात सीईओ पाठक यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांना नोटीस बाजवल्या आहेत तसेच त्याला अनुकम्पा वर नोकरी देताना कागदपत्रे न तपासणाऱ्या सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Leave a Reply