अहमदाबाद- विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने आठव्यांदा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला धूळ चारली.रोहितच्या 86 धावा आणि बुमराह,सिराज,कुलदीप,हार्दिक यांचा अचूक मारा यामुळे भारताने 7 गडी राखून सहज विजय मिळवला.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय भारतीय गोलंदाजाने आपल्या कामगिरीने सार्थ ठरवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह यांच्यासह अष्टपैलू हार्दिक पंड्याचा भेदक मारा, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाच्या फिरकीच्या जादूसमोर पाकिस्तानचा डाव पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कर्णधार बाबर आझम आणि स्टार फलंदाज रिझवान या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने १९१ धावांपर्यंत मजल मारली होती. ३० षटकांत पाकिस्तानच्या ३ बाद १५६ धावा होत्या. यानंतर अवघ्या ३३ धावांत पाकिस्तानने ६ गडी गमावले. (IND vs PAK World Cup) पाकिस्तानच्या संघ अवघ्या ४२.५ षटकांमध्येच तंबूत परतला. मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेत अवघ्या १९१ धावांवर पाकिस्तानला रोखले. पाकिस्तानचा डाव ४३ व्या षटकांमध्येच संपुष्टात आला.
- नागपूरपेक्षा मोठा शिक्षक घोटाळा बीडमध्ये!एस आयटी मार्फत चौकशीची गरज!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- परळी रेल्वे स्टेशन पुनर्विकासासाठी 25 कोटी!
१९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या कर्णधार रोहित शर्माने भारताला दमदार सुरुवात करुन दिली. सलामीवीर शुभमन गिल पाठोपाठ आणि विराट कोहली आउट झाल्यानंतरही रोहितने आपली दमदार फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाचा विजयाची औपचारिकता पूर्ण केली. त्याने ६३ चेंडूत ८६ धावा केल्या. यामध्ये ६ चौकार तर ६ षटकार फटकावले.
रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० षटकार पूर्ण केले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० षटकार मारणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरला. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या नावावर ३५१ षटकार आणि वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेलच्या नावावर ३३१ षटकार आहेत. वन-डे विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक षटकार हे रोहित शर्माच्या नावार आहेत.
Leave a Reply