बीड- केवळ भारतातच नाही तर विदेशातही तिरुमला हा ब्रँड आणि बीड च नाव पोहचवणाऱ्या द कुटे ग्रुपच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागाने तपासणी सुरू केली अन बीडमध्ये कुटे अडचणीत आल्याची अफवा पसरली.त्याचा फटका सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा पतसंस्थेला बसला आहे.पतसंस्थेमधून ठेवी काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.एका अफवेमुळे हजारोंच्या काळजाचा ठोका चुकला असून त्यामुळे ज्ञानराधामध्ये प्रचंड गर्दी उसळली आहे.
बीड येथील सुरेश कुटे आणि अर्चना कुटे या दाम्पत्याने काही वर्षांपूर्वी तिरुमला या नावाने तेल उद्योग सुरू केला.लोकांच्या विश्वासाला पात्र ठरल्याने या उद्योगाने विदेशापर्यंत मजल मारली.खाद्यतेल सोबतच खोबरेल तेल,कपडा उद्योग,पशुखाद्य अशा वेगवेगळ्या व्यवसायात कुटे ग्रुपने भरारी घेतली.
तिरुमला ग्रुपने इन्कम टॅक्स मध्ये काही चुका केल्या असतील तर त्याबाबत संबंधित विभाग त्यांना दंड करेल मात्र त्यामुळे ज्ञानराधा बंद होईल किंवा होत आहे हे म्हणणे योग्य होणार नाही.
गेल्या पाच सात वर्षात कुटे ग्रुपने महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या राज्यात आपला ब्रँड पोहचवला.विदेशातही हा ब्रँड पोहचला.मात्र दोन दिवसांपासून कुटे ग्रुपच्या मुंबई, छत्रपती संभाजी नगर,बीड अशा काही कार्यलयावर इन्कम टॅक्स विभागाने भेटी देऊन चौकशी सुरू केली .
ही बातमी मार्केटमध्ये पसरली आणि गुरुवारी दिवसभर कुटे यांच्या ज्ञानराधा पतसंस्थेमध्ये ठेवीदारांनी ठेवी काढण्यासाठी गर्दी केली.वास्तविक पाहता तिरुमला आणि ज्ञानराधा या दोन्ही वेगवेगळ्या संस्था आहेत, पण मालक एक असल्याने लोक अफवेला बळी पडत आहेत.
पतसंस्था असो की बँक एकाच दिवशी शेकडो नागरिक पैसे काढण्यासाठी आले तर त्यांना एकाच वेळी पैसे दिले जाऊ शकत नाहीत.तरीदेखील ज्ञानराधा मधून ठेवीदारांना रोख तसेच आरटीजीएस च्या माध्यमातून पैसे दिले जात आहेत.ज्ञानराधा चा व्यवसाय जवळपास दोन हजार कोटींचा आहे.तर तिरुमला ग्रुपचा व्यवसाय दहा हजार कोटींच्या घरात आहे.
ज्या व्यक्तीने दहा हजार कोटींचा व्यवसाय उभारला तो लोकांचे पैसे बुडवण्याचा विचार करेल का याचा विचार करणे आवश्यक आहे. परंतु मार्केटमध्ये गुरुवारी एक अफवा पसरली आणि ज्ञानराधामध्ये ठेवीदारांनी गर्दी केली.नेमकी काय परिस्थिती आहे हे सुरेश कुटे यांनाच माहीत परंतु लोकांना पतसंस्थेच्या बाबत आजपर्यंत बसलेले फटके पाहता लोकांनी गर्दी केली ते ही चूक म्हणता येणार नाही.
बीड सारख्या ग्रामीण भागातून विदेशापर्यंत मजल मारणाऱ्या एका उद्योजकाला अडचणीच्या काळात बीडकरांनी साथ देणे आवश्यक आहे हे नक्की.
Leave a Reply