बीड- जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी हे पालकमंत्री अतुल सावे यांच्यापेक्षा स्वतःला मोठे समजू लागले आहेत.शिक्षण विभागातील शाळांच्या दुरुस्ती आणि नवीन इमारत बांधकामासाठी मागणी केल्यापेक्षा अधिकचा निधी मंजूर झाला.मग काय कुलकर्णी यांनी आपल्या जवळच्या लोकांना खिरापत वाटल्याप्रमाणे कामांचे वाटप करत पालकमंत्री यांच्याच अधिकारावर गदा आणल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जिल्हा नियोजन समितीने मार्च एन्ड जवळ आल्याने कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली.यामध्ये बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सुरवातीला दोन कोटी 48 लाखाच्या कामांची मागणी केली होती.यामध्ये प्राथमिक शाळांच्या इमारत दुरुस्तीसाठी 48 लाख 77 हजार रुपयांची आणि प्राथमिक शाळांच्या इमारत बांधकामासाठी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती.
त्यानंतर नियोजन विभागाकडून तब्बल 6 कोटी 23 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला.त्यामुळे शिक्षण विभागाने नव्याने शाळा खोल्या दुरुस्ती आणि बांधकामांची यादी तयार केली.याला मंजुरी मिळाल्यानंतर शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी तब्बल दोन ते तीन कोटींच्या वर्क ऑर्डर स्वतःच वाटप केल्या.
हे करताना त्यांनी आपल्याच जवळच्या लोकांना या कामांचे वाटप केले.याचाच अर्थ कुलकर्णी यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्यापेक्षा जास्त कामे वाटप करत त्यांच्याच अधिकारावर अतिक्रमण केले आहे.
कुलकर्णी यांच्या या कामात चाटे नावाचा एक कंत्राटी कर्मचारी जो त्यांचा पीए म्हणून मिरवतो त्याने आणि कुर्लेकर या कर्मचाऱ्याने मदत केली आहे.विशेष म्हणजे चाटे याची नियुक्ती ही धारूर येथे आहे.मात्र तो कुलकर्णी यांचा पीए म्हणून कार्यालयात बसतो आणि अधिकारी कर्मचाऱ्यांवर रुबाब करतो.
या सर्व प्रकरणात अतुल सावे यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.कारण शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांनी थेट सावे यांनाच चॅलेंज केले आहे.
Leave a Reply