बीड-बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी जी पी बीजलवाड यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सीईओ अविनाश पाठक यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.तीन दिवसात उत्तर द्या अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा देण्यात आला आहे.
शिक्षण विभागातील सहायक प्रशासन अधिकारी जी पी बीजलवाड यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या.त्यामुळे बीड जिल्हा परिषदेचे सीईओ पाठक यांनी त्यांना नोटीस पाठवली आहे.या नोटिसमध्ये म्हटले आहे की,केंद्रप्रमुख पदोन्नती संचिका वारंवार सांगूनही सादर न करणे,रोस्टर सादर करण्यास विलंब करणे,अधिनस्त कर्मचाऱ्यांची टेबल तपासणी न करणे,सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी न करणे,वरिष्ठांशी गैरवर्तणुक करणे,आदेशाचे पालन न करणे यासह इतर आरोप ठेवण्यात आले आहेत.
बीजलवाड यांच्याविरोधात यापूर्वी देखील अनेक तक्रारी झाल्या होत्या,मात्र तत्कालीन सीईओ अजित पवार यांनी त्यांना वेळोवेळी पाठीशी घातले होते.
- आजचे राशीभविष्य!
- एक अकेला शेर, बाकी सब ढेर!संदीप क्षीरसागर पुन्हा विजयी!
- शहरात 98 हजार तर ग्रामीण मध्ये एक लाख चाळीस हजार मतदान!
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
दरम्यान पाठक यांनी या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या तीन दिवसात उत्तरं आल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply