एसपी ठाकूर चौकशी करणार का ?
बीड- जिल्हा व सत्र न्यायालयाने आदित्य अनुप धनवे या आरोपीला बलात्कार प्रकरणात दहा वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.या आरोपीने आपल्यावरील गुन्हा लपवून जिल्हा परिषदेत नोकरी मिळवली होती.विशेष बाब म्हणजे ज्या शहर पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल होता त्याच ठाण्याने त्याला निल कॅरेक्टर सर्टिफिकेट कसकाय दिले असा प्रश्न उपस्थित होत आहे.पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर या प्रकरणात कारवाई करणार का अशी चर्चा होऊ लागली आहे.
आदित्य अनुप धनवे या व्यक्तीवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा 26 फेब्रुवारी 2019 रोजी दाखल झाला.पोलिसांनी आरोपीला अटक केली.न्यायालयाने सुरवातीला पोलीस कोठडी अन नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली.
हा आरोपी बलात्काराच्या गुन्ह्यात महिनाभरपेक्षा जास्त काळ जेलमध्ये असताना एप्रिल 2019 मध्ये त्याला चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ( कॅरेक्टर सर्टिफिकेट) देण्यात आले.
या आरोपीला दोन दिवसांपूर्वी दहा वर्षाची शिक्षा झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे.आपल्याच ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला कोणताही गुन्हा नाही,चांगले चारित्र्य आहे असे प्रमाणपत्र कसकाय दिले जाऊ शकते याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
त्यावेळी म्हणजेच 2019 साली बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, चारित्र्य पडताळणी चा विभाग सांभाळणारे कर्मचारी यांनी धनवे ला हे प्रमाणपत्र कशाच्या आधारावर दिले याबाबत प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
आता हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे चौकशी करणार का,संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply