बीड- कर्तव्यावर असताना ढगफुटी झाल्याने बीडचे जवान पांडुरंग तावरे हे तीन दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत.पती बेपत्ता झाल्याने त्यांच्या पत्नीसह कुटुंबीय हैराण झाले आहेत.
सिक्कीममध्ये मंगळवारी पहाटे १.३० वाजता झालेल्या ढगफुटी झाली. त्यामुळे तिस्ता नदीला पूर आला होता. नदीच्या पाण्याची पातळी १५ ते २० फुटांनी वाढली. यानंतर नदीलगतच्या भागात पूर आला. नदीलगतच्या परिसरात लष्कराची छावणी होती, ती पुरात वाहून गेली आणि तेथे उभी असलेली ४१ वाहने बुडाली. या जवानांमध्ये बीड मधील जवान पांडुरंग वामन तावरे ( वय ३६ ) हे बेपत्ता झाले आहे.
जवान तावरे यांचे मुळ गाव काकडहिरा ता.पाटोदा जि. बीड येथील आहेत. २००९ मध्ये आर्मी भरती मध्ये ते रुजू झालेले आहेत. मागील १४ वर्षांपासून ते १८ महार बटालियन मध्ये नायक या पदावर आहेत. त्यांनी दिल्ली, राजस्थान, आसाम, बिकानेर, हिमाचल प्रदेश, अरुनाचल, मध्यप्रदेश , लेबनॉन, पंजाब विविध ठिकाणी देश सेवा केली.
- पहिला निकाल परळीचा तर आष्टी सर्वात शेवटी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- घाटनांदूर मध्ये राडा, जिल्हाधिकारी यांचे कठोर कारवाईचे आदेश!
- आजचे राशीभविष्य!
दोन महिन्यांपूर्वी गंगाटोक सिक्कीम येथे कर्तव्यासाठी गेले होते. मंगळवारी ( दि. ३ ) रात्री ते बंगाल बॅंकडुगी युनिट कडे निघाले होते. ते स्वतः एका वाहनाचे चालक आहे. दरम्यान त्यांनी मंगळवारी रात्री ९.३० वाजता पत्नी गोदावरी यांना मोबाईल वर संपर्क साधला, चर्चा केली. बुधवारी ( दि. ४) सकाळी सिक्कीम येथील ढगफुटीमुळे तिस्ता नदीला पूर आला त्या जवान वाहून गेल्याचे बातम्या ऐकायला मिळाले. दोन दिवसांपासून जवानांचे प्रमुख एस.एम. सुबेदार मेजर यांच्यासमवेत संपर्क होत आहे. परंतु संपर्क होत नसल्याच्या सुचना बंगाल बॅंकडुगी युनिट येथून मिळत असल्याचे जवान यांच्या पत्नी गोदावरी तावरे यांनी सांगितले.
Leave a Reply