बीड- बीड शहरातील जालना रोडवर सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सावकारांचे दोन गट एकमेकाला भिडले.यामध्ये कोठारी नामक सावकारांना जोरदार मारहाण झाली तर त्यांच्या माणसांनी दुसऱ्या गटातील लोकांवर दगडफेक केली. या सगळ्या प्रकारामुळे काहीकाळ जालना रोडवर तणाव निर्माण झाला होता.
सोमवारी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास कोठारी नामक सावकार आणि प्लॉटिंग चा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडे स्वराज्य नगर भागातील काही लोक आले होते.हे कोठारी महाशय अनेक वर्षांपासून सावकार म्हणून धंदा करतात.त्याचसोबत अलीकडच्या काळात त्याने प्लॉटिंग चा व्यवसाय देखील सुरू केला होता.
कोठारी यांनी अनेकांना व्याजाने पैसे दिले आहेत ,तसेच प्लॉटिंग च्या व्यवसायातून देखील अनेकांचे इसार त्यांनी घेतले आहेत.सोमवारी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान कोठारी यांच्याकडे स्वराज्य नगर भागातील प्लॉट मधील पैसे मागण्यांसाठी काही लोक स्कॉर्पिओ गाडीतून आले होते.
सुरवातीला शांताई हॉटेलमध्ये या लोकांत बाचाबाची झाली.त्यानंतर हॉटेल समोर हमरीतुमरी झाली.त्यानंतर हॉटेलसमोरील कुंड्या एकमेकांना फेकून मारण्यात आल्या. यामध्ये कोठारी यांना बराच मार लागला.
- वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे – धनंजय मुंडे
त्यानंतर कोठारी यांचे दोन चार पार्टनर त्या ठिकाणी आले.त्यांनी स्कॉर्पिओ मधून आलेल्या लोकांवर दगडफेक केली हे लोक समोरच्या जाधव पेट्रोल पंपाकडे पळून गेले.तेथे जाऊन त्यांना मारहाण करण्यात आली.
या घटनेमुळे काहीकाळ जालना रोडवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Leave a Reply