बीड- सीबीआय चे पोलिस असल्याचे सांगत लूटमार करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले.यातील एक आरोपी हा मोक्का अंतर्गत फरार होता.तब्बल वीस पेक्षा अधिक गुन्ह्यात हवे असलेले हे आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत.
हयात अली बाबूलाल अली आणि मिस्किन जावेद जाफरी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.मागील महिन्यात या आरोपीनी अंबाजोगाई लातूर महामार्गावर श्यामसुंदर मोरे यांना रस्त्यात अडवून एक लाख पाच हजार रुपयांचा ऐवज चोरला होता.
या दोन्ही आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करत होते.हे दोन्ही आरोपी बीड जिल्ह्यात आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले.हयात अली याच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे मात्र तो फरार होता.लोणी,तोफखाना,वारजे,पुणे,श्रीरामपूर, वानवडी अशा अनेक पोलीस स्टेशनमध्ये यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.
- वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- मला ठरवून टार्गेट केले जात आहे, पण मी अभिमन्यु नाही, मी अर्जुन आहे – धनंजय मुंडे
या दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे,पीएसआय खटावकर,सलीम शेख,मनोज वाघ यांच्या पथकाने अटक करून अंबाजोगाई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
Leave a Reply