बीड- प्राथमिक शिक्षक असतानाही बोगस कागदपत्रे जोडून शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळवणाऱ्या सिद्धेश्वर माटे यांच्यावर शिक्षण विभाग भलताच मेहेरबान असल्याचे चित्र आहे माटे यांच्या विषयी तत्कालीन गटशिक्षणाधिकारी टेकाळे यांनी सविस्तर अहवाल दिल्यानंतर देखील चौकशी समितीच्या नावाखाली शिक्षणाधिकारी कुलकर्णी हे माटेंना पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे कुलकर्णी साहेब माटे यांना घरी पाठवण्यासाठी मुहूर्त शोधत आहात का अशी चर्चा आता होऊ लागली आहे
बीड जिल्हा परिषदेच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात 2014 साली तत्कालीन सीईओ राजीव जवळेकर यांना लक्ष्मी दर्शन करत सिद्धेश्वर माटे तसेच इतरांनी प्राथमिक शिक्षक असतानाही पदोन्नती मिळवली जिल्हा परिषदेमध्ये मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख असणाऱ्या लोकांना डावलून माटे व त्याच्या सहकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे पदोन्नती मिळवली 2014 ते 23 या नऊ वर्षाच्या काळात त्यांनी केलेला बोगस कारभार घेतलेला पगार व इतर गोष्टी व सुरू कराव्यात तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचा अहवाल बीडचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी टेकाळे यांनी दिला होता.
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
- ज्याला आई कळली त्याला धर्म कळला -कबीर महाराज!
- वाचाळ कासले डिसमिस!
- आजचे राशीभविष्य!
या प्रकरणात न्यूज अँड व्ह्यूज ने आवाज उठवल्यानंतर शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी श्रीमती मैना बोराडे यांची एक सदस्य समिती नियुक्त केली मात्र एक सदस्य काय चौकशी करणार त्यामुळे यामध्ये पंधरा दिवस गेले त्यानंतर बोराडे यांनी आणखी दोन सदस्यांची मागणी केली तेव्हा कुठे शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांनी शिक्षण विस्तार अधिकारी तुरुकुमारे आणि ऋषिकेश शेळके अशा तीन लोकांची समिती नियुक्त केली आहे
या समितीला तातडीने अहवाल देण्याचे आदेश देऊन देखील आठवड्याचा कालावधी उलटला आहे मात्र अद्याप पर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही कुलकर्णी यांना माटे यांच्यावर कारवाई करायची आहे की त्यांना पाठीशी घालायचे आहे असा प्रश्न यामुळे चर्चिला जात आहे .
Leave a Reply