बीड- परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने जप्तीची कारवाई केली आहे.19 कोटी रुपयांचे साहित्य या विभागाने पोलीस बंदोबस्तात जप्त केले.भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या कारखान्यावर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने नोटिसा बजावल्या होत्या. पण या नोटिशींना प्रत्युत्तर न दिल्याने एप्रिल महिन्यात छापेमारी करतानाच काही कागदपत्रे हस्तगत केली होती. त्यामध्ये आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने बेकायदेशीररित्या १९ कोटींचा जीएसटी कर बुडवल्याचे स्पष्ट झाले होते. शनिवारी कारखान्याला यासंदर्भात नोटीस बजावली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना यापूर्वीच युनियन बँकेने सील केला असून लिलावाची प्रक्रिया देखील सुरू केल्याची चर्चा सुरू आहे.
एकीकडे केंद्रीय सहकार विभागाने सहकारी साखर कारखान्यांना कोट्यावधी रुपयांचा आयकर माफ करुन मदत केली आहे. मात्र, याचवेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याला जीएसटी विभागाने केलेली कारवाईवरुन राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहेत.
Leave a Reply