बीड- यावर्षी जिल्ह्यासह मराठवाड्यात पावसाने दोन अडीच महिने ओढ दिली.त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक करपून गेले.महाग मोलाचे बियाणे वाया गेले.शेतात काहीच पिकलं नाही.त्यामुळे कोलमडून पडलेल्या बीड जिल्ह्यातील बळीराजाला सरकारने साथ द्यावी.शंभर टक्के अग्रीम मंजूर करावा अशी मागणी बीडचे आ संदिप क्षीरसागर यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के अग्रीम द्या
आ.संदीप क्षीरसागर यांची मागणी
बीड मतदारसंघासह जिल्हाभरात पावसाच्या अनियमिततेमुळे ६० टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना या संकटातून धीर देण्यासाठी आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के पीक विमा अग्रीम मंजूर करून रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा. अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
यावर्षी संपूर्ण पावसाळ्यात शेतीला पूरक असा एकही पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांनी चालू हंगामात सोयाबीन, कापूस, मूग, उडीद इत्यादी पिकांचा मोठ्या प्रमाणावर पेरा केलेला आहे. सद्यस्थितीला मान्सूनचा अर्ध्यापेक्षा जास्त काळ लोटला असला तरी शेतीसाठी पूरक पाऊस झाला नाही. अगोदरच पावसाने दडी मारल्याने पिके करपून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
- आजचे राशीभविष्य!
- ज्याला आई कळली त्याला धर्म कळला -कबीर महाराज!
- वाचाळ कासले डिसमिस!
- आजचे राशीभविष्य!
- मुंडे पुन्हा त्याच पदावर यावेत -महंत नामदेव शास्त्री!
त्यातच कालच्या पावसाने थोड्याफार प्रमाणात आलेल्या उडीद, मुगाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी बांधव मोठ्या आस्मानी संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना या मोठ्या संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदतीची मोठी गरज असल्याने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १०० टक्के पीक विमा अग्रीम मंजूर करून तातडीने संबंधित शेतकरी बांधवांच्या खात्यांवर व
वितरीत करण्यासाठी सत्वर कार्यवाही करा. अशी मागणी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यांनी राज्य सरकार व बीड जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
Leave a Reply