गेवराई- तालुक्यातील जातेगाव येथील बंडू चव्हाण आणि सोनाली चव्हाण या दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
बीड जिल्ह्यातील जातेगाव येथे सुरू असलेल्या उपोषणात सहभागी पती-पत्नी अचानक घरी गेले. यानंतर त्यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे उघडकीस आली आहे. राजु बंडू चव्हाण (वय 31) आणि सोनाली राजु चव्हाण (वय 28) असे मयत दाम्पत्यांचे नाव आहे.
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- माफियांना मातीत घालणार!कोणाच्याही पाया पडू नका -अजित पवार!
जातेगाव येथे मराठा आरक्षणा संदर्भात उपोषण सुरू आहे. या आंदोलनात राजु चव्हाण हे सहभागी झाले होते. अचानक उपोषणातून उठले आणि उपोषणस्थळापासून पंधरा फुटाच्या अंतरावर असलेल्या घरी जावून बायकोसह गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही.
Leave a Reply