News & View

ताज्या घडामोडी

चंद्राबाबू नायडू ना मुलासह अटक !

आंध्रप्रदेश- आंध्रप्रदेश चे माजी मुख्यमंत्री तथा तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे.कौशल्य विकास घोटाळ्यात नायडू यांच्यासह त्यांचे सहा सहकारी आणि मुलाला देखील अटक करण्यात आली आहे.

शनिवारी पहाटे ३ वाजता चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यासाठी एक पथक दाखल झाले होते. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक आल्यावर तेथे जमलेल्या टीडीपी कार्यकर्त्यांनी विरोध केला. तसेच एसपीजी दलानेही नायडू यांना नियमानुसार सकाळी 5.30 वाजेपर्यंत अटक केली जाऊ शकत नाही, असे सांगून पोलिसांना परवानगी नाकारली. त्यानंतर अखेर सकाळी 6 वाजता चंद्राबाबू नायडू यांना त्यांच्या घरातून खाली बोलावून अटक करण्यात आली.

एपी डीआयजींनी त्यांना कौशल्य विकास घोटाळ्यात अटक करण्यात आल्याचे सांगितले. यापूर्वी, आंध्र प्रदेशचे मंत्री आणि सत्ताधारी वायएसआर काँग्रेस पक्षाच्या (YSRCP) नेत्यांनी दावा केला होता की TDP अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्र्यांना लवकरच अटक केली जाईल.

आंध्र प्रदेशमधील वायएसआर काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी चंद्रबाबू नायडू यांना भ्रष्टाचारप्रकरणी दोन दिवसात अटक होईल, असा दावा केला होता. सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रबाबू नायडू यांच्यावर 118 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला. त्याशिवाय त्यांच्यावर 350 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचाही आरोप आहे. दरम्यान, कौशल विकास घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू यांना आरोपी एक नाव देण्यात आलेय. चंद्रबाबू नायडू यांच्यावर या प्रकरणात 250 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. 2021 मध्ये याप्रकरणी पहिल्यांदा गुन्हा नोंदवला गेला होता. त्यावेळी 25 जणांना आरोपी घोषित केले होते. विशेष म्हणजे नायडू यांचे नाव एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नव्हत.

चंद्रबाबू नायडू यांच्या सरकारमध्ये युवांना रोजगार देण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट योजना आणली होती. कौशल विकास प्रशिक्षण अंतर्गत तरुणांना नोकरीसाठी तयार करण्याची योजना होती. सरकारने योजनाअंतर्गंत ही जबाबदारी Siemens या कंपनीला दिला होती. सहा क्लस्टर्स तयार करण्यात आले होते, याचा एकूण खर्च 3300 कोटी रुपये तका होती. प्रत्येक क्लस्टरवर 560 कोटींचा खर्च होता.

राज्य सरकारमधील एकूण 10 टक्के म्हणजेच, 370 कोटी रुपये खर्च करणार होते. इतर 90 टक्के खर्च कौशल विकास प्रशिक्षण देणारी कंपनी Siemens करणार होती. चंद्रबाबू नायडू सरकारने त्यांच्या वाट्याचे 371 कोटी रुपये शेल कंपनीला ट्रान्सफर केले. त्याशिवाय त्यासंदर्भातील कागदपत्रेही संपवल्याचा आरोप आहे.

सीआयडीने अटक केल्यानंतर चंद्रबाबू नायडू यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कौशल विकास घोटाळ्यासंदर्भातील पुराव्याशिवाय न्यायालयात केस सुरु आहे. न्यायालयात प्रकरण सुरु असताना अटक कशी कऱण्यात आली, असे नायडू म्हणाले. चंद्रबाबू नायडू यांच्या वकिलांनी कागदपत्रे आणि एफआयआर कॉपी मागितली असता पोलिसांनी देण्यास नकार दिला. रिमांड रिपोर्ट दाखवू शकत नाही, असे पोलिसांनी सांगितले.

चंद्रबाबू नायडू यांच्याशिवाय टीडीपीच्या इतर नेत्यांनाही अटक केली आहे.ब्रह्मानंद रेड्डी, भूमा अखिलप्रिया, जगत विख्यात रेड्डी, एवी सुब्बार रेड्डी, बीसी जनार्दन रेड्डी आणि स्थानिक नेत्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, चंद्रबाबू नायडूंचा मुलगा नारा लोकेश याला गोदावरी जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *