बीड- जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अविनाश पाठक यांनी शिस्त लावण्यास सुरवात केली आहे.मात्र बीडच्या गटशिक्षणाधिकारी पदावर नियुक्ती दिलेल्या भगवान सोनवणे यांचा इतिहास बहुदा त्यांनी तपासला नसावा.बोगस अपंग प्रमाणपत्र जोडून लाभ घेणाऱ्या सोनवणे यांना या पदावर बसवताना पाठक यांनी नेमकं काय पाहिलं अन काय केलं अशी चर्चा होत आहे.
गेल्या महिनाभरापासून बीडचे गटशिक्षणाधिकारी पद रिक्त होते.या पदासाठी तुकाराम जाधव,श्रीमती गंगाखेडकर,तुकाराम पवार यांची नावे चर्चेत होती.अचानक जाधव यांची ऑर्डर देखील झाली. मात्र अवघ्या तासाभरात जाधव यांनी पदभार घेण्यास नकार दिल्याने पुन्हा हे पद रिक्तच राहिले.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी अचानक भगवान सोनवणे यांची यापदावर वर्णी लागली.कदाचित पाठक यांना सोनवणे यांचे कारनामे माहीत नसतील,पण शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी तरी त्याची माहिती देणे आवश्यक होते.
पाठक साहेब हे भगवान सोनवणे बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात अडकलेले आहेत.त्यांची एसआर टी रुग्णालयात मेडिकल बोर्डाकडून तपासणी देखील झाली.मात्र पुढं काय झालं ते त्यांनाच माहीत.
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
- ज्याला आई कळली त्याला धर्म कळला -कबीर महाराज!
- वाचाळ कासले डिसमिस!
- आजचे राशीभविष्य!
बर या सोनवणे महाशयांना तत्कालीन सीईओ अजित पवार यांनी निलंबित केले होते.त्यानंतर त्यांना अचानक पुन्हा सेवेत घेण्यात आले.त्यांची निलंबनानंतर पोस्टिंग माध्यमिक शिक्षण विभागात करण्यात आली.पण कुलकर्णी यांच्या प्रेमामुळे त्यांच्याकडे प्राथमिक चा कारभार देण्यात आला.
ज्या माणसाची नियुक्ती माध्यमिक विभागात आहे त्याच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा चार्ज देताना पाठक यांनी नेमके कोणते नियम पाहिले,कोणत्या कायद्याचा अभ्यास केला याची चर्चा सुरू आहे.
Leave a Reply