बीड- येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी सिध्देश्वर माटे, वरिष्ठ लिपिक शिवाजी आतकरे आणि कनिष्ठ लिपिक निखिल बाहेगव्हाणकर यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सीईओ अविनाश पाठक यांनी शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. लवकरच या तिघांवर निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून पदभार घेतल्यानंतर अविनाश पाठक यांनी कामात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.जल जीवन मिशन असेल किंवा शिक्षण विभाग यामध्ये कामचुकार कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे देण्यास सुरुवात केली आहे.
दोन दिवसांपूर्वी ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील भेंडेकर याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता गटशिक्षणाधिकारी कार्यलयातील शिक्षण विस्तार अधिकारी सिद्धेश्वर माटे यांना वरिष्ठांशी असभ्य वर्तणूक,नागरिकांशी गैरवर्तणुक करणे आदि कारणावरून शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत नोटीस बजावली आहे.
- बडतर्फ कासले विरुद्ध पोलिसात तक्रार!
- आजचे राशीभविष्य!
- ज्याला आई कळली त्याला धर्म कळला -कबीर महाराज!
- वाचाळ कासले डिसमिस!
- आजचे राशीभविष्य!
माटे यांच्यासोबत वरिष्ठ लिपिक शिवाजी आतकरे आणि कनिष्ठ लिपिक निखिल बाहेगव्हाणकर या दोन कर्मचाऱ्यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे.
सीईओ अविनाश पाठक यांच्या धडक कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाला आहे. पाठक यांनी जल जीवन मिशन योजनेत झालेल्या घोटाळ्यात देखील लक्ष घातले आहे.येथील भेंडेकर ला निलंबित केल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा शिक्षण विभागाकडे वळवला आहे.
Leave a Reply