बीड- शरद पवार यांचा फोटो आमच्या देवघरात आहे,मात्र 17 तारखेच्या सभेत त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा अन माझ्यावर टीका केली.सभेपुर्वी कोणीतरी त्यांच्या कानात सांगितले अन ते माझ्याबद्दल बोलले.होय मी अजित पवार यांचा कार्यकर्ता आहे अस ठासून सांगत अमरसिंह पंडित यांनी शरद पवार यांना उत्तर दिलं.
बीड येथे आयोजित सभेत अमरसिंह पंडित यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या टीकेला उत्तर दिले.यावेळी बोलताना ते म्हणाले की,मी नेहमी तुमच्याशी एकनिष्ठ होतो.आमचं घर कायम तुमच्या सोबत होत.18 वर्षात एकदाही तुम्ही बीडमध्ये आल्यावर आम्ही सोबत नाहीत अस झालं नाही.पण यावेळी परिस्थिती वेगळी होती.
मी अनेकदा तुम्हाला सांगितले की एका घराच्या दोन चौकटी करू नका,पण परिस्थिती मुळे हे झालं.गेवराई मतदार संघाचा विकास करण्यासाठी आम्ही अजित पवार यांच्यासोबत गेलोत, ही आमची चूक आहे का?तुम्ही 2003 साली गेवराईत आल्यावर सांगितले होत की मी आताच दोन गाठी काढून आलो आहे,जिल्ह्यातील दोन गाठी काढायच्या आहेत,ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं.
- आजचे राशीभविष्य!
- आजचे राशीभविष्य!
- माफियांना मातीत घालणार!कोणाच्याही पाया पडू नका -अजित पवार!
- आजचे राशोभविष्य!
- सिंदफणा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यांना मान्यता!
त्यावेळी नगर रोडच्या बंगल्यात तुमच्या कानात कोणीतरी काहीतरी बोललं अन तुम्ही आमच्यावर टीका केली.त्यानंतर 17 तारखेच्या सभेपुर्वी तुमच्या कानात पुन्हा त्या बंगल्यातील कोणीतरी काहीतरी बोललं अन तुम्ही माझ्यावर टीका केली.हे योग्य नाही.
तुमचा फोटो आमच्या देवघरात आहे,आम्ही फोटो यापुढे वापरणार नाही पण तुमचे संस्कार कसे काढणार अस म्हणत अमरसिंह पंडित यांनी शरद पवार यांना उत्तर दिलं.
Leave a Reply