बीड- शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पीएसआय लक्ष्मण कीर्तने सह कर्मचारी रणजित पवार या दोघांना 28 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी देखील दोन कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत.मंगळवारी सायंकाळी पीएसआय लक्ष्मण कीर्तने आणि शिपाई रणजित पवार या दोघांनी एका प्रकरणात 28 हजार रुपयांची लाच मागितली.
याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी या दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Leave a Reply