बीड- अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचारी आणि डॉक्टर भरती प्रकरणी लातूरची चौकशी समिती बीडमध्ये दाखल झाली आहे.ही समिती कागदपत्रे आणि तत्कालीन सीएस डॉ साबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांची चौकशी करणार आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात तब्बल 75 जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या जिल्हाप्रमुखाच्या सांगण्यावरून महाराष्ट्र विकास ग्रुप नाशिक या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते.
या सर्व प्रकरणात विधिमंडळात मुद्दा उपस्थित झाल्यानंतर बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात भरतीला स्थगिती देण्याचा निर्णय आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतला होता.
आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालक यांच्या आदेशावरून लातूर उपसंचालक कार्यालयातील सहायक संचालक श्रीमती बादाडे, अंभोरे, आणि इतर दोघे जण चौकशी साठी दाखल झाले आहेत.या समितीमध्ये लोखंडी येथील डॉ चव्हाण आणि जितेंद्र देशपांडे हे देखील असल्याची महिती सुत्रांनी दिली आहे.
Leave a Reply