News & View

ताज्या घडामोडी

मनसैनिकांनी फोडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन !

बीड- शहरातील प्रमुख रस्त्यावर पडलेले खड्डे आणि स्वच्छता या विषयावरून बीडमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले.दोन दिवसांपूर्वी खड्याभोवती रांगोळी काढून निषेध करणाऱ्या या सैनिकांनी शुक्रवारी सकाळी नगर परिषद मुख्याधिकारी यांचे दालन फोडले.

बीड शहरातील मोंढा आणि एमआयडीसी भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनकेदा मागणी करुनही या रस्त्याची दुरुस्ती होत नव्हती. तर या खड्यामुळे रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढल आहे. मनसेकडून देखील अनेकदा या रस्त्याच्या कामासाठी निवदेन देण्यात आले. मोंढा आणि एमआयडीसी भागात जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आणि शाळकरी मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीसाठी मनसेच्या वतीने रांगोळी काढून आंदोलन करण्यात आले होते. मात्र, तरीही प्रशासन दखल घेत नसल्याने आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी बीडच्या नगरपरिषद कार्यालयाची तोडफोड केली आहे.

अमरधाम स्मशानभूमी ते जालना रोडला जोडणारा रस्ता हा मोठया बाजार पेठेला जोडणारा प्रमुख रस्ता असून, शहरातील नागरिकांनी शाळकरी मुलं देखील या रस्त्याचा वापर करतात. मात्र काही दिवसापासून या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. हे प्रशासनाला अनेक वेळा सांगून सुद्धा प्रशासन काहीच करत नसल्याचे सांगत आज मनसे कार्यकर्त्यांनी बीड नगरपरिषद कार्यालयात तोडफोड केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *