बीड- जलयुक्त शिवार अभियान मध्ये लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या परळी,अंबाजोगाई सह जिल्ह्यातील दहा ते बारा गुत्तेदार अन मजूर संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.या संस्थांनी आणि गुत्तेदार यांनी चुकीचे पत्ते देऊन शासनाची दिशाभूल केली आहे.त्यामुळे त्यांना नोटीस पाठवणे कठीण जात आहे,अशा सर्व गुत्तेदार आणि मजूर संस्थांवर तातडीने कारवाई करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली.
जलयुक्त शिवार परळी गैरव्यवहार प्रकरणातील दोषी ठेकेदार यांचे विरुध्द काळया यादीत समावेश करण्याची कार्यवाही चालु असून त्या अनुषंगाने खालील यादीतील ठेकेदार/मजुर संस्था यांना काळया यादीत का समावेश करण्यात येवु नये? या बाबत कारणे दाखवा नोटीस उपलब्ध असलेल्या पत्त्यावर पाठविण्यात आलेली होती. सदर नोटीस पर्याप्त पत्ते नसल्याच्या कारणांमुळे परत आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आपणांस सुचित करण्यात येते की, आपण आपले परिपुर्ण अद्यावत पत्ते जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बीड ,बिंदुसरा नर्सरी,धानोरा रोड बीड 431122 या कार्यालयात दि.10 जुलै 2023 पर्यंत उपलब्ध करुन द्यावेत जेणे करुन आपणांस सदर नोटीसा बजावण्यात येतील व आपणांस आपला खुलासा सादर करता येईल.
या उपरही आपण आपले अद्यावत व परिपुर्ण पत्ते उपलब्ध करुन दिले नाहीत तर आपले काहीही म्हणणे नाही असे समजुन आपणांविरुध्द एकतर्फी कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.असे जिल्हाधिकारी तथाअध्यक्ष,जलयुक्त शिवार समिती बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या संस्था -पाणलोट समिती सेलु प., प्रकाश विठठल गिते ,हनुमान मजुर सहकारी संस्था अंबाजोगाई , ठाकुर भगतसिंग बलबीर ता.परळी,लाड सुनील रा.परळी
जलयुक्त शिवार परळी गैरव्यवहार प्रकरणातील दोषी ठेकेदार यांचे विरुध्द काळया यादीत समावेश करण्याची कार्यवाही चालु आहे. त्या अनुषंगाने खालील यादीतील ठेकेदार/मजुर संस्था यांना काळया यादीत का समावेश करण्यात येवु नये? या बाबत कारणे दाखवा नोटीस उपलब्ध असलेल्या पत्त्यावर पाठविण्यात आलेली होती तथापि आपण यावर काहीही खुलासा सादर केलेला नाही त्या अनुषंगाने आपणांस या जाहिर प्रगटनाव्दारे आपला खुलासा सादर करणेकामी अंतिम संधी देण्यात येत आहे तरी आपण आपले खुलासे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बीड ,बिंदुसरा नर्सरी,धानोरा रोड बीड 431122 या कार्यालयात दि.10.08.2023 पर्यंत सादर करावेत ,या उपरही आपण आपले खुलासे सादर केले नाहीत तर आपले काहीही म्हणणे नाही असे समजुन आपणांविरुध्द एकतर्फी कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी तथाअध्यक्ष,जलयुक्त शिवार समिती बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
नोटिस प्राप्त होवुनही खुलासे सादर न केलेल्या ठेकेदारांची नावे जगताप जगन्नाथ ज्ञानबा रा.नंदागौळ ,अशोक मजुर सह.संस्था,रेवली ,सिध्दार्थ मजुर सह संस्था,जहाँगीर मोहा,दत्तदिगंबर मजुर सह संस्था मोहगाव ,करुणा मजुर सह संस्था ता.सोनी जवळा,श्रमजीवी मजुर सह संस्था ,बोरगाव
Leave a Reply