माजलगाव- शासनाची परवानगी न घेता शेतक-यांना बोगस खत विक्री प्रकरणी तेलंगना राज्यातील हैद्राबाद येथील नवा भारत फर्टिलाझर्स कंपनीच्या संचालक मंडळासह वाशिम जिल्हयातील एका विक्रेत्याविरुध्द माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्हास्तरीय गुण नियंत्रण भरारी पथकास माजलगाव येथे बोगस खत विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन माजलगाव येथील बायपास रोडवरील नवा भारत फर्टिलायझर लि. कंपनीच्या रासायनिक खत विक्री केंद्राची तपासणी केली असता तेथे नवा भारत फर्टीलायझरने तयार केलेले सीएमएस ग्रॅन्युल्स 10.0510 या खताच्या 40 किलो वजनाच्या 338 बॅग ज्याची एकूण किमंत 4 लाख 5 हजार 262 रुपये होती.
या खताचा नमूना विश्लेषणसाठी औरंगाबाद येथील खत चाचणी प्रयोग शाळेत पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असता त्या खताचा नमूना अप्रमाणित आढळून आला आहे. या प्रकरणी बीड येथील जिल्हा गुण नियंत्रण निरिक्षक जनार्धन बाबासाहेब भगत यांच्या फिर्यादीवरुन तेलंगना राज्यातील हैद्राबाद येथील नवा फर्टीलायझर्स कंपनीचे संचालक मंडळ व विक्रेता उमेश नारायण गजभर रा. चिंचाळा हनुमान मंदिरजवळ मंगरुळपीर जि. वाशिम यांच्या विरुध्द शेतक-यांची व शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी अत्यावयशक वस्तु कायद्याचे कलम 3 व 7 खत नियंत्रण आदेश कलम 2 (h)4,7,12,13 व 35 तसेच भा.द. वी. कलम 420 या कलमान्वये गुन्हा दाखल आहे.
तपास माजलगाव शहर पोलीस करत असून सदरील कारवाई जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.के. जेजुरकर आणि कृषी विकास अधिकारी एस. डी. गरांडे यांच्या मार्गदशनाखाली जिल्हास्तरीय गुणनियंत्रण भरारी पथकाने केली आहे. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे आणि जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शन लाभल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.के. जेजुरकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
Leave a Reply