नवी दिल्ली- कोळसा खाण वाटप घोटाळ्यात दोषी ठरलेले माजी खा विजय दर्डा आणि मुलगा करन दर्डा या दोघांना न्यायालयाने चार वर्षांनी शिक्षा सुनावली आहे.दर्डा यांना न्यायालयाने मोठा दणका दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
विजय दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा तसेच यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेच्या प्रकरणात चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता, दोन ज्येष्ठ लोकसेवक केएस क्रोफा आणि केसी सामरिया यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.न्यायालयाने विजय दर्डा आणि इतरांना कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.
Leave a Reply