बीड- आज ही पतसंस्था बुडाली,या ठेवीदारांना धोका झाला,कोट्यवधी रुपये बुडवून संचालक फरार या अन अशा बातम्यांनी एकीकडे गोंधळ उडालेला असताना तब्बल सतरा वर्षांपासून ठेवीदार अन ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत ज्ञानराधा मल्टिस्टेट मात्र लोकांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे.या पाठीमागे मुख्य प्रवर्तक सुरेश कुटे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची प्रचंड मेहनत आहे हे नाकारून चालणार नाही हे ही तितकेच खरे आहे.
बीड असो की छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेल्या जिजाऊ पतसंस्था असो की आदर्श पतसंस्था यांनी ग्राहकांचे पैसे इतरत्र वापरत फसवणूक करत असल्याचे समोर आले.
बीड जिल्ह्यात गेल्या वर्ष दोन वर्षात आठ ते दहा पतसंस्था बुडाल्या किंवा ग्राहकांना फसवून गेल्या.मात्र बीडचे प्रतिष्ठित उद्योजक सुरेश कुटे यांनी आपले आईवडील यांच्या नावाने सतरा वर्षांपूर्वी लावलेले ज्ञानराधा पतसंस्था चे रोप आणि त्याचा वेलआज गगणावरी पोहचला आहे.छोटे छोटे व्यावसायिक, ठेवीदार आणि ग्राहक यांच्या विश्वासाच्या बळावर आज ज्ञानराधा पतसंस्थेच्या 33 शाखांचा विस्तार झाला आहे.
गेल्या सतरा वर्षात तब्बल 2453 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून 1647 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.ज्या माध्यमातून हजारो तरुण व्यावसायिकांनी आपले उद्योग सुरू केले आहेत.विशेष बाब म्हणजे कोणीही आलं अन कर्ज घेऊन गेल हि सिस्टीम इथे नाहीये.गावातील किंवा त्या भागातील दोन चार प्रतिष्ठित नागरिकांची शिफारस,उद्योग धंद्याचे स्वरूप पाहून,स्पॉट इंस्पेक्शन केल्यानंतरच कर्ज मंजुरीची प्रक्रिया पार पाडली जाते.
अलीकडच्या काळात पतसंस्था असोत की अर्बन निधी यांचे पेव फुटले आहे.एखाद्या छोट्याशा गाळ्यात ऑफिसउघडायचे चार दोन कर्मचारी नियुक्त करायचे अन वर्ष दोन वर्षात गाशा गुंडाळायचा हा धंदा झाला आहे.अशा परिस्थितीत ज्ञानराधाने मात्र ग्राहकांचा विश्वास कमावला आहे.सात मजली इमारतीमधून सर्व शाखा आणि कर्मचारी यांच्या कामकाजावर लक्षठेवण्या सोबतच ग्राहकांच्या पैशाची देखील काळजी घेतली जाते.
सुरेश कुटे,सौ अर्चना कुटे याजोडीला आज महाराष्ट्र च काय पण संपूर्ण देशात एक वेगळी ओळख आहे.तिरुमला नावाचा ब्रँड या बीडच्या उद्योजकाने सातासमुद्रापार नेला आहे.नाना पाटेकर,माधुरी दीक्षित,सुप्रिया सचिन पिळगावकर यांच्यासारखे दिग्गज कलाकार आज तिरुमला शी जोडले गेलेले आहेत.
कुटे ग्रुप ने जसे देश विदेशात नाव केले आहे त्याच पद्धतीने ज्ञानराधाने देखील राज्यभर आपल्या ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.त्यामुळेच आजच्या अविश्वासाच्या वातावरणात ज्ञानराधा मधील ठेवीत मात्र दररोज वाढच होत आहे.
Leave a Reply