News & View

ताज्या घडामोडी

images 1

मिलिया कडून शासनाची फसवणूक -तावरे!

बीडबीड शहरातील मिलिया प्राथमिक शाळेने 2010 पासून शहराच्या वेगवेगळ्या भागात अनधिकृत पणे भाग शाळा सुरु केल्या आहेत. या शाळा अनधिकृत असल्याचा अहवाल 2010 साली तत्कालीन उपशिक्षणाधिकारी यांनी दिल्यानंतर देखील मिलिया कडून या शाळा गेल्या सोळा वर्षांपासून सुरूच आहेत. विशेष म्हणजे या शाळेवर शिक्षकांची नेमणूक करून त्यांचे बोगस शालार्थ आयडी काढण्याचा उद्योग या संस्थेने केला आहे. या शाळेवर आणि संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मनसे चे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी केली आहे.

बीड शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, उच्च महाविद्यालय असलेल्या अंजुमन इशात ए तालीम या संस्थेने मिलिया या नावाने शाळा, कॉलेज सुरु केले आहेत.

मात्र या संस्थेने बीड शहरात प्राथमिक शाळा च्या नावाने शाहूनगर, बालेपीर, गांधीनगर, भालदारपुरा अशा वेगवेगळ्या भागात भाग शाळा सुरु केल्या आहेत. या भाग शाळा अनधिकृत असल्याचा अहवाल 2010 साली तत्कालीन उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड यांनी दिला होता.

गेल्या 16 वर्षात या भाग शाळा बंद करण्याबाबत शिक्षण विभागाने कसलीच कारवाई केली नाही. प्रत्येकवेळी संस्थेने लक्ष्मी दर्शनाचा वापर करून शिक्षण विभागाला मॅनेज केले आणि शासनाची फसवणूक केली.

मिलिया शाळेच्या सुरु असलेल्या एका भाग शाळेवर कारवाई करण्याबाबत मागील महिन्यात शिक्षण विभागाने पत्र काढले. मात्र इतर शाळा सुरूच आहेत.

विशेष बाब म्हणजे मिलिया शाळेने बोगस भाग शाळावर बोगस विद्यार्थी संख्या दाखवून मोठ्या प्रमाणात पंधरा ते वीस शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांचे बोगस शालार्थ आयडी देखील काढण्यात आले आहेत. हा सगळा प्रकार शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने सुरु आहे.

याबाबत मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी आवाज उठवला असून मिलिया च्या भाग शाळा बंद करून बोगस शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना पडमुक्त करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा ईशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *