जालना -पूर्णवादी नागरि सहकारी बँकेच्याजालना शाखेतून तब्बल आठ कोटींपेक्षा जास्त रकमेचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचा शाखाधिकारी शिरीष देवळे याला जालना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पूर्णवादी बँकेच्या जालना शाखेचा शाखाधिकारी शिरीष देवळे याने पंचमुखी वेअर हाऊसचे मालक यांच्याशी संगणमत करून आठ कोटी बारा लाख 92 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून देवळे विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
जालना पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे दिला होता. सदर आरोपी देवळे हा जालन्यातच असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अंबड चौफुली येथून अटक केली.





Leave a Reply