बीड – बीड जिल्हा रुग्णालयाचा कारभार म्हणजे आंधळं दळतय अन कुत्र पीठ खातय असा झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश सोळंके यांचा प्रशासनावर वचक नसल्याने इथे चोऱ्याचे प्रकार होऊ लागले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालय परिसराची पाहणी करत सूचना दिल्या असल्या तरी या सोळंके महाशयांच्या ढिसाळ कारभाराबाबत मात्र त्यांनी कठोर पावले उचलून कारवाई करणे अपेक्षित आहे.
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीड येथील जिल्हा रुग्णालयात गेल्या दहा-वीस वर्षात कधीच चोरीची किंवा मारामारीची घटना घडली नाही मात्र डॉक्टर सतीश सोळंके यांनी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर जिल्हा रुग्णालय कुठल्या ना कुठल्या वादात सापडल्याचे दिसत आहे.
जिल्हा रुग्णालयाची बेड संख्या ही 300 पेक्षा अधिक असताना या ठिकाणी रुग्णांना वेळेवर वेळ मिळत नाही स्ट्रेचर उपलब्ध होत नाही ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा नेहमीच असतो कर्मचारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दमदाटी करतात तसेच रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याच्या तक्रारी आहेत.

मागील आठवड्यात रुग्णालयाची नवीन इमारत असलेल्या परिसरात लावलेले एयर कंडीशन चे महागडे पाईप अज्ञात लोकांनी चोरी करून नेले ज्या इमारतीचा ताबा अद्याप रुग्णालयाकडे आलेला नाही तोपर्यंत जर या ठिकाणी चोरी होणार असेल तर सीएस सोळंके आणि त्यांचे प्रशासन हजामती करते की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या भ्रष्ट आणि निकृष्ट कारभारामुळे जिल्ह्याच्या अब्रूचे धनवडे निघाले आहेत ही गोष्ट लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी रुग्णालयाला भेट दिली दोशींवर कारवाई करण्याचे आदेशही दिले परंतु सोळंके यांच्या ढिसाळ कारभारामुळेच येथे चोऱ्या होणे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मारहाण होणे त्यांना वेळेवर सुविधा उपलब्ध न होणे असे जे काही प्रकार होत आहेत त्याला जबाबदार धरून सोळंके यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी होत आहे.





Leave a Reply